TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात तरुणासोबत घडलं भयंकर ; एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच आई, वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या जबर धक्क्याने एका १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील प्रमोद विष्णू जंजाळ (वय १७), असे मयत तरुणाचे नाव आहे. एकुलता एक मृतदेह बघताच आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला होता.

सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील प्रमोद जंजाळ हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जून रोजी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडिल व प्रमोद हे शेतात गेले होते. दरम्यान, प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. ही वायर प्रमोद याच्या निदर्शनास आली नाही. नेमके वखरमुळे ही वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वखरला झाला. तर प्रमोद याच्या हातात वख्खरचा दांडा असल्याने त्यास विजेचा जबर धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

शेजारी काम करणाऱ्या लोकांच्या घटना लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रमोद यास तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमोद यास मृत घोषित केले. या वेळी आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला. विष्णू जंजाळ यांना प्रमोद हा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जमिनीवरुन वायर टाकल्यानेच निष्पाप मुलाचा जीव गेला !
शेजारच्या शेतकऱ्याने विष्णू जंजाळ यांच्या शेतातून थेट जमिनीवरुच विजेची वायर टाकल्याने माझ्या निष्पाप मुलास जीव गमवावा लागल्याची माहिती माध्यमांशी बोलताना विष्णु जंजाळ यांनी स्वतः दिली. मयत प्रमोद याच्या पश्चात्य आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. कष्टाळू व मेहनती तसेच अभ्यासात हुशार अशा प्रमोदच्या अकस्मात मृत्यूने वणगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Śētāta taruṇāsōbata ghaḍalaṁ bhayaṅkara; ēkulatyā ēka mulācā mr̥tadēha baghatāca ā'īvaḍilān̄cā kāḷīja ciraṇārā ākrōśa!

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

धरणगाव बडगुजर समाज पंच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवान गोपाल सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन

August 23, 2021

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

August 3, 2022

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026

संतापजनक : काकानेच केला पुतणी, पुतण्यावर लैंगिक अत्याचार !

July 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group