नाशिक (वृत्तसंस्था) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः छगन भुजबळ यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांनी ट्वीट केलं आहे की, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझरचा नियमित वापर करा.”
रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे. आठवड्याभरात सहा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजप खासदार रक्षा खडसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण झाली आहे.