TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहा महिन्यापासून मोहरद गावात ग्रामसेवकाचा पत्ताच नाही, बिडिओंचे दुर्लक्ष ; लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा संताप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in चोपडा, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहरद गावी जवळपास दहा महिन्यापासून ग्रामसेवक हजर नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दहा महिन्यापासून आजपर्यंत एकही ग्रामसभा, मासिक सभा झाली नसल्याचे मोहरद येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच हभीब बुरहान तडवी, अमजत सुजात तडवी (ग्रामपंचायत सदस्य,) सुरलाल बारेला (ग्रामपंचायत सदस्य,) यांनी पंचायत समिती आवारात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, मागील दहा महिन्यात पंचायत समितीचे बिडिओ भरत कासोदे यांच्याकडे तोंडीं व लेखी तक्रार देऊनही आमच्या गावाकडे मुद्द्यांम दुर्लक्ष केले जात आहे. तसेच ग्रामस्थांना खोटे ठरवून बिडिओ हे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामसेवक सोबत आज बिडिओ यांना ग्रामस्थांनी घेरले असता बिडिओने ग्रामसेवकाला उद्या कामावर हजर व्हा, असे सांगितले. परंतु ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधीकडे चार्ज असताना खंडेराव पाटील यांना चार्ज दिला, असे पारधी यांनी सांगितले. परंतु पारधी यांनी चार्ज मला सोपवलेलाच नाही, असं बिडिओ कासोदे समोर सांगितले. यावेळी बिडिओ समोर मोहरद येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

बिडिओ कासोदेकर यांना पत्रकार भेटायला गेले असता त्यांनी पत्रकारांना उडवा उडवीचे उत्तर दिले. तसेच ग्रामसेवक दहा महिन्यापासून येत नसल्याचे पत्रकारांनी विचारले असता कासोदेकर म्हटले की, मोहरद ग्रामस्थ खोटं बोलत आहेत. नंतर पत्रकारांनी उमर्टि गावाच्या भ्रष्टाचारा संदर्भात प्रश्न विचारले असता कासोदेकरांनी काही पत्रकारांना तुम्ही बातमी टाकली ना?… असं उत्तर देऊन टाळाटाळ केली. त्यावर पत्रकारांनी बातमी टाकली याचा अर्थ समोरील भ्रष्टाचार संपला का? असा प्रश्न विचारताच कासोदेकरांनी सारवा सावर करून मी असं कुठे बोललो?, असे म्हणत वेळ मारून नेली. आपण ग्रामसेवकाला पाठीशी घालता आहेत का?, असं पत्रकारांनी परत विचारले असता मी ग्रामसेवकाला का पाठीशी घालू?, असे उत्तर कासोदेकर यांनी दिले.

बीडीओ यांच्या उत्तरांनी मोहरद ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. बिडिओ यांना भेटल्यावरही उद्या ग्रामसेवक येईल याची शाश्वती आम्हाला वाटत नाही. मागील दहा महिन्यापासून ह्याच बिडिओ साहेबांनी अनेक वेळा सांगितले की, मी ग्रामसेवकाला पाठवतो. तुम्ही तक्रार कुठेही करू नका, पत्रकारांशी बोलू नका, असेही सांगितले. यावेळी मोहरद ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, उद्यापासून जर मोहरद गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक आले नाही, तर आम्ही दोन दिवसाच्या आत सीईओ व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार आहोत.

ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधी यांना बोलते केले असता यांनी सांगितले की, माझ्याकडे तीन गावाचे चार्ज आहेत. त्यामुळे आठवड्यातून मी एक दिवस मोहरद गावी जात असतो व आठवडा भरायचे काम करून घेत असतो. परंतु त्यांच्यासमोर मोहरद गावाचे उपसरपंच व सदस्य यांनी सांगितले की दहा महिन्यापासून तुम्ही गावात कुठे व कधी आलात सांगा?. हबीब बुरहान तडवी, यांनी सांगितले की, ग्रामसेवक हे जग जाहीर खोटं बोलत आहे. यावर ग्रामसेवकाने काढता पाय घेतला. याबाबत चौकशी न झाल्यास उद्रेक होईल असे ही मोहरद ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांनी सांगितले. तरी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जातीने लक्ष देऊन चोपडा पंचायत समितीची चौकशी लावावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
Next Post

चोपडा पंकज बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : ना. गुलाबराव पाटील !

August 26, 2023

रेल्वे भरतीचा वाद पेटला : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली ; स्टेशनवर दगडफेक

January 26, 2022

आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्याद्वारे वाघूर धरण जलपूजन ; दोन वर्षांची शहरासाठी पाण्याची चिंता मिटली !

September 4, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group