जळगाव (प्रतिनिधी ) गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून वाचनाची महत्ता अधोरेखीत करतांना आज तंत्रज्ञान हे कितीही अद्ययावत बनलेले असले तरी वाचनाचे महत्व अबाधीत असल्याचे नमूद केले. वाचाल तर वाचाल अशी म्हण असून प्रतिकूल परिस्थितीतही व्यक्ती घडविण्याचे कार्य ग्रंथ आणि ग्रंथालये करीत असतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय जीवनातील अविभाज्य घटक आहे. ग्रंथ हे महत्वाचे शस्त्र असून ग्रंथालय हेच ज्ञानेचे देवालय असून या देवालयाचे पुस्तक हेच देव आहे. ग्रंथाचे वाचन केल्याने विचार आणि विचाराने आचार तयार होतात . वाचनामुळे विचारांची निर्मिती होते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ग्रंथोत्सव सन 2022-23 ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 29 नोव्हेंबर 2012 रोजी जळगाव येथे ग्रंथोत्सव 2012 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जळगाव मनपाच्या महापौर श्रीमती जयश्रीताई महाजन, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, अखिल भारतीय मराठी प्रशासक संघ प्रतिनिधी युवराज माळी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष युवराज वाणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव सुहास रोकडे, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, धरणगाव माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,राजेंद्र पाटील, नवलसिंग पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह वाचक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथोत्सव सन 2022-23 ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 29 नोव्हेंबर 2012 रोजी जळगाव येथे ग्रंथोत्सव 2012 चे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन !
डीपीडीसी मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रंथालयासाठी वीज बचत व्हावी यासाठी ३१ लक्ष निधी देऊन मागील वर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. या 50 wat सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यन्वित करण्यात आले. यामुळे जिल्हा ग्रंथालय , विद्यार्थी व वाचकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा ग्रंथालय विभागा मार्फत ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी २ दिवसात होणाऱ्या कार्याक्रमची सविस्तर माहिती विषद केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसी मधुन जिल्हा ग्रंथालय व सौर उर्जेचा प्रकल्प उभारणी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार हर्षल पाटील यांनी केले.