धरणगाव (प्रतिनिधी) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे धरणगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील या प्रवेश सोहळ्याबाबत माहिती नव्हती.
मागील २० दिव्सापापुर्वी माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अहमद पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाळधी येथील शासकीय निवासस्थान गाठत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शिंदे प्रवेश केला. विशेष म्हणजे अहमद पठाण यांच्या आधी याच प्रभागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू शेख यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता.
यावेळी माजी माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी नगरसेवक वासू चौधरी, अभिजित पाटील, विलास महाजन, विजय महाजन, गुटया पाटील कमलेश बोरसे, बाळू जाधव, विजय महाजन, भैय्या महाजन, संजय चौधरी, विलास महाजन, पवन महाजन, रवी महाजन, सद्दाम सय्यद, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.