जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगरातून एकाच रात्री चार दुचाकी चोरुन नेल्या. ही घटना दि. ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री तब्बल चार दुचाकी चोरुन नेल्यामुळे दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगरात शैलेंद्र राजाराम आमोदेकर (वय ५१) हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरीत करतात. दि. ३० रोजी रारीच्या सुमारास त्यांनी घरासमोर त्यांची (एमएच १९, सीके ६९८१) क्रमांकाची दुचाकी लावलेली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्यासह त्या परिसरात राहणारे अभय पारसमल जैन यांची (एमएच २०, एव्ही ४७४४) क्रमांकाची, देविदास तुकाराम पाटील यांची (एमएच १८, एएम १९८५) तर अशोक डिगंबर पाटील यांची (एमएच १९, बीडी ०२१०) क्रमाकाची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. या चोरीच्या घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वांनी तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय
एकाच रात्री एकाच भागातून चार दुचाकी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्या. त्यामुळे दादावाडी परिसरात दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तसेच पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे.
हॉटेलच्या बाहेरु तरुणाची दुचाकी लंपास
अजिंठा चौफुलीवरील हॉटेल प्रिन्सच्या बाहेरुन दि. १६ रोजी दुपारच्या सुमारास प्रमोद लालचंद जांगीड (वय ३६, रा. शंकर आप्पा नगर, पिंप्राळा) याची (एमएच १९, बीएफ २६२५) क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. त्यांनी संपुर्ण परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करणयत आला आहे.















