चाळीसगाव (23 नोव्हेंबर 2024) : चाळीसगावात अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा विजय निश्चित आहे. दोस्तीतील कुस्ती कोण जिंकणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले असताना चाळीसगावकरांनी मात्र आमदार मंगेशदादांवर पुन्हा विश्वास टाकत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांची लढत महाविकास आघाडीचे उन्मेष पाटील यांच्याशी झाली. निकालानुसार आमदार मंगेश चव्हाण आता 70 हजारांच्या लीडने पुढे असून लवकरच निकालाची घोषणा होणार आहे.
आता जवळपास 19 फेर्या संपलेल्या असून चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. चाळीसगावात आता चित्र स्पष्ट झाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.