धरणगाव (प्रतिनिधी) शेतात चराईसाठी सोडलेल्या ८ म्हशींपैकी चार अचानक दगावल्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अनिल बबन मराठे, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
अनिल मराठे यांनी धरणगाव शिवारातील शेतात ८ म्हशी चराईसाठी सोडल्या होत्या. याच शेतात मक्याचे कुटार पडले होते. २ ते ३ दिवसापासून एकसारखे कुटार खाल्ल्याने या म्हशीना सिवेरिसपेक्शन व टिपलीचे लक्षणे जाणवली व त्यातील ४ म्हशी दगावल्याचे कळते. यामुळे अनिल मराठे या शेतकऱ्याचे साधारण ५ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच चार म्हशींवर उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, डॉ. महाजन सहायक यांनी शेतात तात्काळ भेट दिली. तर डॉ. प्रदीप पवार, डॉ. नंदु गोतवळे, समाधान पाटील, सनी पाटील या कर्मचाऱ्यांनी म्हशींवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले. तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी भेट दिली असून तलाठ्यांना पंचनामा करून म्हशीच्या मालकांना शासनातर्फे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.