चाळीसगाव (प्रतिनिधी) टोळीने गुन्हे करणाऱ्या चौघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे (रा भडगांव रोड आर. के. लॉन्स जवळ चाळीसगांव), अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार (रा. प्लॉट एरीया चाळीसगांव), धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (रा. स्वामी समर्थनगर चाळीसगांव) आणि चोंग्या उर्फ तुषार महेद्रं जाधव (रा. नारायणवाडी पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या चाळीसगाव येथील चौघांची नावे आहेत. या गुन्हेगारांविरुद्ध चाळीसगावं शहर पोलिस स्टेशनला एकुण 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पो. नि. संदीप बी पाटील, पोना विनोद विठठल भोई, पोना तुकाराम जुलालसिंग चव्हाण, पोकॉ सतरसिंग राजेद्रं माहेर, मपोकॉ सबा शेख आदींनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिनस्त पोलीस अंमलदार सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे आदींनी याकामी सहकार्य केले.