औरंगाबाद (वृत्तसंस्था) बीड महामार्गावर एका कार आणि तेलाच्या टँकरची भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष होते. चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे असे मृतांचे नाव असून राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनसुर, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी औरंगाबादला जात असताना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कार चालकाचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेने येत असलेल्या एका ऑइल टँकरला धडकली दरम्यान या अपघातात घटनास्थळी जागीच दोन ठार तर उपचारादरम्यान दोघे मृत झाले. अशी माहिती हाती लागली आहे.