TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथा गुन्हा दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत ; जाणून घ्या…आतापर्यंत काय-काय घडलं?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत जहांगीरपुरी भागामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी सोनू चिकना याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

सोनू चिकनावर दगडफेकीवेळी गोळीबार केल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनू चिकनाचा शोध सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत 22 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या 22 व्यतिरिक्त आणखी दोन अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

आतापर्यंत काय घडलं?

  1. पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर नोंदवला आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार करताना दिसत असलेल्या सोनू चिकनाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  2. आरोपी सोनू चिकनाची अटक सर्वात महत्त्वाची असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्याचे वर्णन कुख्यात गुन्हेगार असं केलं आहे.
  3. पहिली एफआयआर 16 एप्रिल रोजी नोंदवण्यात आली होती. यामध्ये विविध गुन्हेगारी कलमांखाली खटला चालवण्यात आला. दुसऱ्या एफआयआरमध्ये परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा या आरोपीविरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिसरी एफआयआर दाखल करण्यात आली.
  4. व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या शस्त्राने सोनू गोळीबार करताना दिसत आहे, त्याच शस्त्रासह सोनू चिकना याला पोलिसांनी अटक केली आहे.
  5. सोनू शेख उर्फ ​​सोनू चिकना याला आज रोहिणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
  6. सोनू चिकनाच्या अटकेसह आतापर्यंत एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
  7. या 22 व्यतिरिक्त दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  8. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. सोमवारी आठ सदस्यांच्या पथकानं हिंसाचाराच्या ठिकाणाहून नमुने गोळा केले.
  9. हिंसाचाराचा आरोप असलेल्या अन्सारचे आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या आरोपांवर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, ‘दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोणीही पक्षाची टोपी घालू शकतो.’
  10. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘सरकारच्या इशाऱ्यावर हिंसाचार होत आहे. सरकारला हवं असते तर हिंसाचार झाला नसता. पोलिसांची कारवाई एकतर्फी आहे.’

एफआयआरनुसार, संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार ते पाच साथीदारांसह आला आणि मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालू लागला. बाचाबाची वाढत गेल्यानं परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर रस्त्यांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. लाठ्या, तलवारी घेऊन लोक रस्त्यावर आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
गुन्हे

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025
गुन्हे

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025
गुन्हे

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025
गुन्हे

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

June 5, 2025
Next Post

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओत पत्नी असल्याचा संशयावरून मुलांसमोरच केली हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात १९ जानेवारीपासून रोटरी उत्सव ; तयारीला वेग !

January 3, 2024

मोदी-शाहांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात ; संजय राऊत यांची कडवट टीका !

September 17, 2024

चुलत सासऱ्याचा भररस्त्यात गोळ्या घालून खून ; धक्कादायक कारण आले समोर !

April 18, 2023

हिंगोणा ग्रामपंचायतीत शासकीय योजनांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा ; विद्यार्थी मोर्चाची चौकशीची मागणी

October 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group