भुसावळ (प्रतिनिधी) बनावट कंपन्या रजिष्ट्रेशन करुन त्या कंपन्यांच्या माध्यमातुन वेगवेगवळया स्किमा राबवुन गुंतवणूकदारांना कमी दिवसात दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली एका व्यवसायिकासह १०० ते २०० जणांची सुमारे १ ते २ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भगवान सुखदेव बाऱ्हे (वय ६३, रा. नवीन निंभोरा, शिवाजी नगर ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ ऑक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत अजय जगदेव इंगळे (चेअरमन), शशांक जगन्नाथ कदम (रा. पिंपरी), सचिन सयाजी चव्हाण (रा. आकुर्डी ता. जि. पुणे), राजू टांकसाळे दामोधर (डायरेक्टर), रमेश जगन्नाथ देवकुळे (डायरेक्टर), संजय जगदेव इंगळे यांनी यांनी संगनमत करुन कट कारस्थान रचुन बोगस बनावट कंपन्या रजिष्ट्रेशन करुन सदर कंपन्यांच्या माध्यमातुन वेगवेगवळया स्किमा राबवुन त्यात गुंतवणुक दारांना कमी दिवसात दाम दुप्पट रक्कमा तसेच आर.डी. स्किम मध्ये जास्त प्रमाणात व्याज देण्याची प्रलोभने दाखवुन त्यांनी लोकांकडुन सदर कंपनीच्या स्किमांवर पैस स्विकारुन माझी ३,८८,००० रु.मुळ गुंतवणुक रक्कमेची तसेच त्यावरील मिळाणारे व्याज रक्कमेचा परतावा केला नसुन तसेच जळगाव जिल्हयातील इतर सुमारे १०० ते २०० लोकांकडुन सुमारे १ त २ कोटी रुपये रक्कमांची कंपनीच्या वेगवेगळया स्किमामध्ये रक्कमा स्विकारुन माझी व माझ्या सारखे इतर गुंतवणुक दारांची फसवणुक केली. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे करीत आहेत.