चोपडा (प्रतिनिधी) फायनान्स कंपनीमध्ये फिल्ड असिस्टंट पदावर कार्यरत असतांना दोघांनी कंपनीची २ लाख १२ हजार २४७ रुपयात फसवणूक (Fraud Of Two Lakhs Of Finance Company) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा पोलिसात (Chopada Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Jalgaon Crime Police)
या संदर्भात अधिक असे की, करण भिका देशमुख (रा. जवखेडा ता. एरंडोल), संजोग सुशिल इवर (रा. पाळधी, राजकुवर नगर) दोघं १९ ऑक्टोबर २०२१ ते २१ जुलै २०२२ च्या काळात फायनान्स कंपनीमध्ये फिल्ड असिस्टंट पदावर कार्यरत होते. दोघांनी आपल्या पदाचा फायदा घेत ग्राहकांकडून कंपनीच्या नावावर २ लाख १२ हजार २४७ रूपये वसुली केली. परंतू वसूल केलेली रक्कम फायनान्स कार्यालयात जमा न करता स्व:ताच्या फायद्यासाठी वापर करुन कंपनीची फसवणूक करुन विश्वासघात केला. या प्रकरणी किरण भिका देशमुख (रा. जवखेडा ता. एरंडोल) यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना संदिप भोई हे करीत आहेत.