पाचोरा (प्रतिनिधी) एक महिला व तिच्या नातेवाईक वारसाची रक्कम बनावट सह्या, अगंठे देऊन परस्पर काढुन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कल्पना रवींद्र शेंदे (पाळधी ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदा शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ, गोविंदा महादू पाटील (सर्व रा. लोहारी ता. पाचोरा) यांनी कल्पना शेंदे व त्यांच्या नातेवाईक वारसाची रक्कम ही बनावट सह्या करुन व वारसाचे खोटे दाखले करुन त्याचेवर खोट्या सह्या अगंठे मारुन रक्कम परस्पर काढुन फसवणुक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात आनंदा शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ, गोविंदा महादू पाटील (सर्व रा. लोहारी ता. पाचोरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ नरेद्र शिंदे करीत आहेत.