जळगाव (प्रतिनिधी) अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त सप्ताहाअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्य हाती घेतले जात आहेत. त्यानुसार शहरातील वहीदत इस्लामी या संघटनेनेतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात सर्व समाजातील सुमारे ४०३ रुग्णांनी लाभ घेतला.
हाजी अहमद नगर, सालार नगर, कासमवाडी व मासुम वाडी येथील लोकांसाठी ‘अपनी गल्ली’ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर बशीर अन्सारी, एमडी, (मेडिसिन) व हृदयरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरात सर्व समाजातील सुमारे ४०३ रुग्णांनी लाभ घेत या शिबिराच्या माध्यमातून औषधी प्राप्त करून घेतल्या व काही रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
शिबिरात ‘या’ डॉक्टरांचे मिळालेले सहकार्य
डॉ. अमजद खान, डॉ. जन्नतुल निसा, डॉ. सायरा आलम, डॉ. वकार शेख, डॉ. समी अहेमद, डॉ. जहाआरा, डॉ. जावेद शेख, डॉ. खान यांनी रुग्णांवर औषधोपचार रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिले. ४०३ रुग्णांमध्ये सुमारे १५७ महिला व मुलींचा यात समावेश होता. महिलांच्या तपासणीसाठी विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिला डॉक्टरांची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने डॉ. जन्नतुल निशा, डॉ. जहाआरा, डॉ. सायरा अस्लम यांचा समावेश होता.
या शिबिराचे औपचारिक उद्घाटन जळगाव शहराचे प्रमुख काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाले. यावेळी व्यासपीठावर वाहिदत इसलामीचे अध्यक्ष अतीक शेख, जावेद शेख, शकील खान, इब्राहिम शेख यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना १६ प्रकारच्या प्राथमिक औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हबीब शेख, सोहेल खान, अशरफ खान, आमदार शेख तला शेख आदींनी परिश्रम घेतले.
















