धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीने 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील महिला व तरुण मुलींकरीता “द केरला स्टोरी” या चित्रपटाच्या मोफतचे शो आयोजन करण्यात आलेले आहे. या चित्रपटास शहरातील महिला व मुलींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
धरणगाव शहरातील ‘द केरला स्टोरी’चे प्रत्येक शो-हाऊस फुल राहत असून आतापर्यंत साधारण 2 हजार महिला व मुलींनी चित्रपट बघण्याचा लाभ घेतला आहे. तसेच भाजपच्या वतीने शहरातील घराघरातील महिला व मुलींना चित्रपट दाखविण्याचा मानस भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन यांनी व्यक्त केला आहे. शहरातील कोट बाजार परिसरातील कुमार टॉकीज येथे चित्रपटाचे शो सुरु असून त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.