धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सन 2003 बी.ए. बॅचचा ‘स्मृतिगंध’ माजी विद्यार्थी मेळावा रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कविता सादरीकरण व गायनामुळे कार्यक्रमात रंगत आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्रा. शेख सर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व मिठाई देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या मेळाव्याला 28 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन मंदार चौधरी, गजानन साठे, गणेश चौधरी, शामकांत पाटील व सुवर्णा पाटील यांनी केले. माजी विद्यार्थी दिनेश पाटील यांच्याकडून स्वीट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच लेखक विजय वाघमारे यांनी स्वलिखित पुस्तकांचे वितरण केले. हा मेळावा मैत्री, आपुलकी व एकतेचा भाव जपणारा ठरला.














