नोएडा (वृत्तसंस्था) एका तरुणाने फेसबुकवर तरुणीसोबत मैत्री करीत बलात्कार करीत तिचा अश्लिल व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणींकडून ७ लाख लुटले.
तरुणीने आरोप केला आहे की, सागरने २१ ऑक्टोबर रोजी तरुणीला नोएडा सेक्टर-१२१ मधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. येथे त्याने तरुणीवर बलात्कार केला. सोबतच तरुणीचा अश्लिल व्हिडीओ शूट केला. याशिवाय काही अश्लिल फोटोदेखील घेतले. यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून ७ लाख रुपये घेत आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. बदनामी होईल या भीतीने तरुणीने पहिल्यांदा कोणाला काहीच सांगितलं नाही. आरोपीने काही दिवसांनी तरुणीना पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, पैसे उकळणे, ब्लॅकमेल आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी गाजियाबादमधील विजयनगर येथी रहिवासी आहे.