धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) वरगव्हाण जि. प. प्राथमिक शाळेला येथे प्रतापजी रणखांब यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी सोहळा साजरा करण्यात आला होता त्यानिमित्ताने वरगव्हाण जि. प. प्राथमिक शाळेला ऑफिस लाॅकर कपाट सप्रेम भेट देण्यात आले. याप्रसंगी बळीराजा परिवाराचे महेश पाटील व निखिल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी व दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन राबवित असलेल्या उपक्रमाला हातभार लागावा हाच उद्देश आहे. याप्रसंगी प्रताप जी रणखांब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. महेश पाटील यांनी आपल्या मनोगतात शाळा विकासासाठी कसा निधी उपलब्ध करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ज्या समाजात आपण जन्माला आलो त्याचे आपण देणं लागतो अशी भावना व्यक्त केली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी दात्यांचे आभार मानत शाळा विकासाची अजून एक टप्पा आम्ही गाठला व लवकरच शाळेचा परिपूर्ण विकास साधण्याचा मानस बोलून दाखविला. या कार्यक्रमास वरगव्हाण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच भुषण पाटील, सदस्य, रविंद्र पाटील, जहागीर तडवी, सुनिल पावरा, प्रताप बारेला, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हसिना तडवी, सदस्य लतीफ तडवी, शाळेतील आशा सोनवणे व शरिफ तडवी आदि उपस्थित होते. यासप्रेम भेटी बद्दल इंद्रायणी सर्वोसेसचे संचालक महेंद्र पाटील (पुणे) ग्रा.प. सदस्या इंद्रायणी पाटील व शिक्षण प्रेमी गजानन पाटील यांनी बळिराजा परिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन रविंद्र पाटील यांनी मानले.