अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा राहुल गांधी विचार मंच आज सकाळी १०:०० वाजता, नववर्षाच्या आरंभी डॉ. रहेमान एस खाटीक (जिल्हा अध्यक्ष-जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली गुलशनलाल मांगीलाल साळुंखे (शहर उपाध्यक्ष – अमळनेर) यांच्या कडून अमळनेर ग्रामिण रूग्णालयातील उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकी केळी, आणि बिस्कीट पुडा वाटप करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय आधिकारी डॉ. ताडे, डॉ. जी. एम. पाटील, फिरोज हुसैन शेख (शहर अल्पसंख्यंक अध्यक्ष – राहुल गांधी विचार मंच), गुलामनबी शेख (शहर अल्पसंख्याक कार्यकारी अध्यक्ष) व कार्यकर्ते स्वप्नील पाटील, हर्षल पाटील, नोमान शेख आदी उपस्थित होते. सदर बाबतीत रूग्णांनी बाळा भाऊ साळुंखे यांचे आभार मानले.