बोदवड (महेंद्र पाटील) तालुक्यातील एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी ‘डीपीडीसी’तून २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागील काही दिवसांपासून सतत एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळावी, ही मागणी लावून धरली होती. ही मागणी लक्षात घेता डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २० लक्ष रुपये रुग्णवाहिकेसाठी निधी मंजुरी दिली. त्यानुसार बोदवड तालुक्यातील ऐनगाव ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली. या रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्ह्या रुग्णालयात नेण्याची सोय उपलब्ध होणार असल्याने एणगाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.