फर्निचर अन् गॅरेज व्यावसायिकाला अधिकचा नफा मिळवण्याचे अमिष पडले महागात
जळगाव (प्रतिनिधी) गुंतवणुकीतून अधिकचा नफा मिळविण्याचे अमिष दाखवून आयोध्यानगर परिसरातील दोन जणांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. फसवणुक झालेल्यांमध्ये गॅरेज व्यावसायिक सावरमल पुरनमल जांगीड (वय ४९) यांची ५ लाख ३५ हजार रुपयात तर फर्निचर व्यावसायिक महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३) यांची ४ लाख ६१ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अयोध्या नगरातील गॅरेज व्यावसायिक सावरमल जांगीड यांना दि. २९ सप्टेंबर रोजी धर्मा सेक्टुरिटीज प्रा. लि. नावाच्या कंपनीतून आचल नामक महिलेने संपर्क साधून ट्रेडिंगविषयी विचारणा केली. ही कंपनी सेबीमध्ये रजिस्टर असल्याचे सांगत त्यांची शेअर मार्केटमध्ये रिसर्च टीम असून गुंतवणुकीवर मोठा फायदा करून देत असल्याचे अमिष दाखविले. त्यानंतर दि. २२ सप्टेंबर रोजी जांगीड यांनी ते हाताळत असलेल्या ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये एक लाख रुपये जमा केले. त्यानंतर सदर महिलेला माहिती दिली. तिने त्यांच्याकडून ओटीपी घेत मोबाईलचा ताबा मिळविला व ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना फायदा होताना दिसला.
आभारी नफा काढता येत नसल्याने झाली फसवणुक
त्यानंतर जागींड यांना एक लिंक पाठवून अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले व रक्कमही जमा करण्यास सांगितली. वेळोवेळी पाच लाख ३५ हजार रुपये जमा केल्यानंतर भरलेल्या रकमेवर सात लाख १८ हजार रुपयांचा नफा व्यावसायिकाला दिसू लागला. मात्र त्यांना ती रक्कम काढता आली नाही व त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला तर मोबाईल बंद येत होता. या प्रकरणी जांगीड यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आचल व राघवसिंग राठोड अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच पद्धतीने फर्निचर व्यावसायीकाला घातला गंडा
सावरमल जांगीड यांची ज्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली त्याच पद्धतीने व त्याच कंपनीचे नाव सांगत दोन जणांनी महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३, रा. आयोध्यानगर) या फर्निचर व्यावसायिकाची चार लाख ६१ हजार ८५० रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यांनाही ट्रेडिंगसाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जुळवून फसवणूक केली.
नुकसान दाखवित दुसरे अॅप्लिकेशन केले डाऊनलोड
या बदल्यात व्यावसायिकाकडून २५ हजार रुपये फी व त्यानंतर पुन्हा ५० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. पाठोपाठ काही नुकसान झाल्याचे दाखवित ते वापरत असलेल्या अॅप्लीकेशनमध्ये फायदा होत नसल्याचे सांगत दुसरे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यासाठी कंपनीचा ब्रोकर म्हणून राघवसिंग राठोड याने संपर्क साधून व्यावसायिकाचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, ई मेलची माहिती घेतली.
दुसऱ्यालाही लावला १७ हजारांचा चूना
एटीएम कार्ड बदलवून २८ हजार रुपये काढल्याचे लक्षात आल्यानंतर याविषयी गजानन पाटील हे बँकेमध्ये तपास करण्यासाठी गेले. त्या वेळी तेथे आणखी एक जण अशीच चौकशी करण्यासाठी आला होता. त्याचेही एटीएम कार्ड बदलवून १७ हजार रुपये काढल्याचे संबंधित व्यक्ती बँक अधिकाऱ्यांना सांगत होता. मात्र याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.
















