अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी व मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले(राजू महाले) यांना गंगाराम सखाराम हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी बढती देण्यात आली.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे,कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीचे शिक्षक मित्र परिवार,मंगळ ग्रह संस्थान तसेच पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.महत्वाचं म्हणजे ते अमळनेर लायन्स क्लब चे प्रेसिडेंट देखील आहेत.सामाजिक,शैक्षणिक,आध्यात्मिक,पत्रकारिता उत्कृष्ट निवेदक अशा कितीतरी क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून डिगंबर महाले यांना ओळखले जाते.