धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची पतपेढी लिमिटेड जळगाव शाखा धरणगावच्या वतीने सलग पंचवीस वर्षापासून सभासद असलेल्या जवळपास ६७ सभासदांचा सत्कारासह गुलाबपुष्प व पाच हजाराचा धनादेश वितरण सोहळा बालकवी ठोंबरे विद्यालयात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एस पाटील (माजी अध्यक्ष सोसायटी)हे होते तर प्रमुख पाहुणे ग.स.चे अध्यक्ष उदय मधुकर पाटील होते तर प्रमुख पाहुणे ग.स. माजी अध्यक्ष व्हि झेड पाटील, संचालक अजब सिंग पाटील, गटनेते मंगेश भोईटे, संचालक महेश पाटील, योगेश इंगळे, भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, रागिनी बाई चव्हाण, विश्वास पाटील, बालकवी ठोंबरे चे मुख्याध्यापक जीवन पाटील, किशोर चव्हाण, बी एस चौधरी पी.यु. पाटील आदी होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उदय पाटील म्हणाले की, सहकार गटाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असून त्या अनुषंगाने संस्थेने जामीन कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत., कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे तसेच सभासदांच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंत विमा कवच योजना लवकरच आणली जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक महेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी पाटील, संजय जाधव, राहुल कुमावत, अनिल सोनवणे, शैलेंद्र वानखेडे, मयूर पाटील, अजित मराठे, प्रवीण सरदार, हर्षल पाटील, तुषार कोळी आदींनी घेतले.