बारामती (प्रतिनिधी) मी ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी दुसरा आमदार मिळाल्यावर मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकीर्दीची व त्या नव्या आमदाराच्या कारकीर्दीची तुलना करा. मग तुम्हाला माझी किंमत कळेल, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे केले. अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतर चर्चेला उधाण आले.
बारामती राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुनील पालवे, रणजीत तावरे, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील, अविनाश बांदल, पुरुषोत्तम जगताप, पोपट गावडे, सुनील पवार, साधू बल्लाळ, मदन देवकाते, अनिता गायकवाड, ज्योती लडकत, द्वारका कारंडे, रेश्मा ढोबळे, करण खलाटे, अविनाश गोफणे, विक्रम भोसले, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, आपण बारामतीचा सर्वांगीण विकास केला. राज्यातील इतर मतदारांपेक्षा जास्त निधी दिला. मीदेखील एक माणूस आहे. मला कधी कधी विचार येतो की, एवढी सगळी कामे करूनही अजित पवार म्हणाले.