अमळनेर (प्रतिनिधी) खावटी अनुदान योजना सन (२०२०-२१) अंतर्गत अमळनेर शहर व तालुक्यातील ढोर कोळी, टोकरे कोळी, जमातीच्या लोकांना सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता अमळनेर आदिवासी टोकरे कोळी पंचमंडळ यांनी एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे मागणी केली.
खावटी योजने अंतर्गत २ हजार रुपये व किराणा किट वाटप करावे आणि नव्याने वंचित लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून सर्वांना लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदना वेळी चंद्रशेखर कोळी, गणेश कोळी, मधुकर सोनवणे, योगेश बाविस्कर, भगवान कोळी, वसंत कोळी आदी समाजबांधव उपस्थित होते.