जळगाव (सुरेश उज्जैनवाल) गेल्या बुधवार (ता.१९) ची रात्र डोंगर कुशीत वसलेल्या इर्शाळ वाडीसाठी काळरात्र ठरली. निसर्गरम्य परिसरातील या वाडीचे अस्तित्वच कोसळलेल्या दरडने नेस्तनाबूत केले. या घटनेने परिस्थितीपुढे सारेच हताश,हतबल असल्याची जाणीव करून दिली. नैसर्गिक आपत्तीत कोसळणार संकट हे दुःखाचे पर्वत ही भेदून टाकणारं असतं, त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याच दु:खासोबत होवू शकत नाही.
अश्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुःखद प्रसंगी लोकांप्रती असणारा कळवळाच मदत कार्याची प्रेरणा देत असतो, या प्रेरणेची प्रचीती पुन्हा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संवेदशीलतेतून परवा अनुभवास आली. दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सर्वात आधी अंधाररात्रीत इर्शाळवाडीत आपल्या दोन सहकारी मंत्र्यांच्या सोबत पोहचणारे गिरीश महाजन पहिले लोकप्रतिनिधी. विपत्ती, असो की नैसर्गिक दुर्घटना श्री.महाजन आवर्जून मदत कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतातच. हा त्यांचा स्थायीभाव म्हणा की आद्यकर्तव्य म्हणा, पण ही वस्तुस्थिती आहे.
अलिकडे राजकारणात कमालीची कटुता असून आरोप, प्रत्यारोपाच्या माध्यमातून एकमेकांचे चिरहरण केले जात असताना नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीला आपल्या जीवाची पर्वा न करता मंत्री श्री. महाजन यांनी घटनास्थळी पोहचण्याचे जे धाडस आणि औदार्य दाखविले, ते केवळ कौतुकास्पद नव्हे, तर लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यतत्पर तेच प्रत्यंकारी उदाहरण आहे. खालापूर जवळील दुर्गम अश्या इरशाळ वाडीच्या वस्तीवर दरड कोसळली. मध्यरात्री तीनच्या सुमारास श्री.महाजन तेथे पोहचले, समोर काळाकुट्ट डोंगर, किर्र आंधार काहीही दिसत नव्हते, कोसळनारा पाऊस त्यात अवघड. उभी चढन, ती तुडवत असताना लागणारी धाप, अशी आव्हानात्मक परिस्थिती असताना केवळ हिंमतबाज व्यक्ती, असे धाडस करू शकतो. आलेल्या प्रसंगाशी दोन हात करूनच पुढे जाण्याची विलक्षण जिद्द असलेल्या श्री.महाजन यांच्या या धाडसाला सलाम..! अशी जोखीम उचलण्यास तरुण ही विचार करेल,पण महाजनांचा, जोश,जोम वयाच्या साठीतही कायम आहे…हे विशेष..!
मुळात धाडसी प्रवृत्ती असल्याने आपत्ती प्रसंगी श्री.महाजन संकटाच्या काळात नेहमीच स्वत: हून लोकांच्या मदतीसाठी धावून गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. सन.२०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी स्वत: पोहत जाऊन अडकलेल्यांना पुरातून बाहेर काढले. एवढेच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यात बिबट्याचा उच्छाद मोडून काढण्यासाठी ते स्वत: पिस्तूल (अधिकृत परवाना प्राप्त) घेवून शोध मोहीम राबवून बिबट्यास जेरेबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे सर्वश्रृत आहे.
अगदी गेल्या महिन्यातील बुलढाणा परिसरातील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघात प्रसंगी घटनास्थळी सर्वात आधी पोहचणारे ते पहिले मंत्री होत. समाज अथवा लोकांच्या दुःखद प्रसंगी इतर ही लोकप्रतिनिधी आपल्या परीने मदत कार्यासाठी धावून जातात, पण जीव धोक्यात घालून जो धावून जातो, तो एखादाच जिगरबाजच असतो आणि तो आहे गिरीश महाजन… जळगाव जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्राचा “हरक्युलीस” !. महान संत संत तुकाराम… यांच्या अभंगाच्या ओळीची प्रचीती महाजनांच्या धाडसीवृत्तीतून दिसून येते…
” बुडता हे जन.. न
देखवे डोळा..
येथे कळवळा म्हणउनी…!
सुरेश उज्जैनवाल (ज्येष्ठ पत्रकार, जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया)
मो.नं. 8888889014