धरणगाव (प्रतिनिधी) एकशे दहा वर्षाची गुणवंतांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलने यशाची पताका फडकवत ठेवली आहे. यंदाचा दहावीचा निकाल ९८ टक्के लागला आहे.
शाळेतील बहुसंख्य मुलींनी नव्वद टक्के पार बाजी मारली असून रोटवद या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कु. कृष्णाली अरविंद शिंदे हिने ९५ टक्के गुण मिळवून प्रथम तर ईशा महेंद्रसिग परिहार हिने ९४.८० टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय येण्याचा मान पटकावला. याशिवाय प्रांजल योगेश मिसर (९३.४०), दमयंती उमेश चव्हाण (९३), यशस्वी विजय माळी (९३), डिंपल एकनाथ पाटील (९२.८०), दिव्या आनंदा पाटील (९२.८०), कौशिक सुधाकर मोरे (९२.८०), अश्विनी मल्हार पाटील (९२.६०), यशोदाबेन गणेशसिंह चव्हाण (९२.४०), दर्शन ज्ञानेश्वर पाटील (९२.४०), वैष्णवी निलेश भदाणे (९१.४०), भुषण यशवंत पाटील (९१) , तेजस सूदर्शन ठाकुर (९१), लिना कांतीलाल भोई (९०.८०), कल्याणी योगेश सोनार (९०.६०), कविता संजय हिरापूरे (९०.६०), गायत्री कडू मराठे (९०.४०), निलेश योगेश पाटील (९०.२०) तर ९० टक्के गुण मिळवून १५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतून १७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १०६ विद्यार्थी हे Distinction मध्ये आले आहेत. ४२ विद्यार्थी हे पहिल्या श्रेणीत, १६ विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने अभिनंदन केले आहे.