नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. बलाली गावात तिने गळफास लावून आत्महत्या केली. रितिका फक्त १७ वर्षांची होती. भारतपूर येथे बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली.
क्रीडा विश्वात आज खळबळजनक घटना उघडकीस आलीय. कुस्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिकाने आत्महत्या केलीय. रितिकाने १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम सामना १४ मार्च रोजी खेळविण्यात आला होता, त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हादरा बसला आणि त्यानंतर १५ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्महत्या केली.
आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती. रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्ता एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
















