जळगाव (प्रतिनिधी) मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गेल्या दहा वर्षांपासून जि एम फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. जि एम फाउंडेशनचे जळगाव शहरात मुख्य समन्वयक अरविंद देशमुख हे काम पाहत असतात. त्यांच्या देखरेखेखाली जिएम फाउंडेशन माध्यमातून जळगाव शहरात गेल्या २ महिन्यापासून महाराष्ट्र शासन यांचे अधिपत्याखाली येणाऱ्या विविध योजनांचे फॉर्म विनामूल्य नागरिक व महिला वर्गाना भरून देत आहेत. यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजना २३००० फॉर्म, श्रम कार्ड १००० फॉर्म, आरोग्य सेतू कार्ड १००० फॉर्म, आयुष्मान भारत कार्ड ५००० फॉर्म, पी. एम. किसान कार्ड ५००० फॉर्म, पीकविमा ५००० फॉर्म हे भरण्यात आले.
हे फॉर्म भरण्यासाठी जळगाव शहर व जिल्यातील सर्व तालुक्यातील नागरिक हे जि.एम. फाउंडेशन विनामूल्य सेवा असल्याने मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. हे फॉर्म भरण्यासाठी जि.एम. फाउंडेशन जि.एस. मैदान समोर मुख्य समन्वयक अरविंद देशमुख यांच्या सोबत २५ प्रतिनिधी व १० कॉम्पुटरवर हे सेवा देत आहेत. यात मयूर पाटील, तुषार चौधरी, पावन कासार, रोहिणी पाटील, अमोल सोनवणे, सचिन सपकाळे यांचा समावेश आहे. तर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, वरील सर्व योजनांचा लाभ व फॉर्म भरण्यासाठी आपण जि. एम. फाउंडेशन जि.एस. मैदान समोर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जि.एम. फाउंडेशनचे मुख्य समन्वयक अरविंद देशमुख यांनी कळविले आहे.