TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी : अशोक जैन !

८६ खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट प्राथमिक संघाच्या निवड चाचणी सामन्यांचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in क्रीडा, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने हे पहिल्यांदाच जळगावात होत आहे. यामध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धेकांनी सर्वोत्तम खेळ केला तर यश नक्कीच मिळेल. पुरूषांच्या क्रिकेट प्रमाणेच आता महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी आहे यासाठी चांगला सराव करण्याचे आवाहन करत, आवश्यक सुविधा देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी अशोक जैन यांनी केलेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला व १९ वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्याने सुरू प्रशिक्षण शिबिरातील निवड चाचणी सामन्यांचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते झाले. क्रीडांगण पूजन व सामन्याचा नाणेफेक सौ. ज्योती जैन यांनी केला.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

नविन घेतलेले मॅकेनिकल रोलर पूजन व दोन पेव्हिलियनचे फीत सोडून उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासोबत १९ वर्षा आतील महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) सुयश बुरकुल, वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, अनिल जोशी यांच्यासह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या तेजल हसबनीस, किरण नवगीरे, अनुजा पाटील या महिला खेळाडूंची उपस्थिती होती. निवड समितीचे सदस्य रेखा गोडबोले, मनिषा लांडे, फिटनेस ट्रेनर मानसी पटवर्धन, योगिता पडियार, सहाय्यक प्रशिक्षक सोनम तांदळे, गोलंदाज प्रशिक्षक राजेश माहुरकर, फिजियो म्हणून प्रांजली पालकर, श्रेया जामदार यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा महाराष्ट्र संघ निवडीसाठी सराव शिबीर आणि निवड चाचणी सामने १६ सप्टेंबर पर्यंत होतील. यात वरिष्ठ खेळाडू ३६ तर १९ वर्षा आतील ५० खेळाडू सहभाग घेतला आहे. दोघंही स्तरातून २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. पुण्याच्या बाहेर पहिल्यांदाच सराव प्रशिक्षक शिबीराचे आयोजन केले असून एकाच छताखाली राहण्यापासून सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मैदानाच्या मध्यभागी अद्यावत आठ टर्फ विकेट, मैदाना बाहेर सरावासाठी तीन सिमेंट विकेट, पाच टर्फ विकेट, दोन बॉलिंग मशिन व खेळाडूंच्या फिटनेससाठी जिम अशा सुविधा महिला खेळाडूंना मिळत असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी दिली.

राष्ट्रीयस्तरावरील निवड चाचणी स्पर्धांच्या निकषासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व आयसीसीच्या क्रिकेट नियमाला धरून ह्या स्पर्धा खेळविल्या जात असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व अतुल जैन यांनी महिलांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेटचे नंदनवन असलेल्या अनुभूती स्कूलच्या या मैदानावर महिलांच्या सराव सामन्यांच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल अतुल जैन यांचे मंदार दळवी यांनी धन्यवाद मानले. फक्त मैदानावरचा खेळ नाही तर जैन हिल्स निसर्गाशी एकरूप होऊन वरिष्ठ व १९ वर्षाआतील खेळाडूंमध्ये परस्परसंवाद होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होईल. येथील सुविधा चांगल्या असून मुख्य प्रशिक्षक या नात्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्रातील महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणींच्या सामन्यांसाठी जळगाव केंद्र करावे ही विनंती करेल असे मंदार दळवी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

उड्डाण पूल व रस्ते दुरुस्ती करीता मनसेची सोमवारी जळगाव जागर यात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप शिवसेनेला टार्गेट करतंय : शिवसेना खा. भावना गवळी

August 30, 2021

दिव्या भोसले यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रिक्त पदे भरण्यासाठी साकडं

July 13, 2021

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ; समोर आला नवीन प्रस्ताव !

June 21, 2022

दाऊदच्या पुतळ्याचे एनएसयूआयने केले दहन

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group