जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या एका गोडावून अचानक लागलेल्या आगीत सुमारे अडीच लाखांचा माल जाळून खाक झाला आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवाजी मोहन आस्वार (बारी) (वय-३६) रा. रामेश्वर कॉलनी हे किरकोळ विक्रीचे व्यवसायिक आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कुरकुरे पाकिटांचा होलसेल व्यवसाय शिवाजी आस्वार यांनी सुरू केला आहे. यासाठी त्यांनी मोहाडी रोडवरील खूपचंद साहित्या टॉवर जवळ एक भाड्याने गोडावूनही घेतले. काल १० रोजी त्यांनी सुमारे अडीच लाखांचा माल गोडावून मध्ये भरला होता. आज ११ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अचानक गोडावूनला आग लागल्याने कुरकुऱ्यांच्या पाकिटे जळून खाक झाली आहेत. नेमकी ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. महापालिकेचा एक बंबाने आग आटोक्यात आणली आहे. तसेच याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.