जळगाव (प्रतिनिधी) जोशी कॉलनीत भागवत कथेदरम्यान गोकुळ अवतरल्याचा भास भाविकांना झाला.
शहरातील जोशी कॉलनीतील गुरू गोरक्षनाथ मंदिरात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन वासुदेव जोशी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे. कथेचे निरूपण श्रीकृष्ण भक्त मनोजचंद्र महाराज, वृंदावन हे करीत आहेत. रविवारी भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णाचे बाळरूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वासुदेवाने कृष्णाला आणून माता यशोदा नंदराजाजवळ दिले. आकर्षक अश्या सजवलेल्या पाळण्यात बाळाला टाकण्यात आले. यावेळी कृष्णजन्म उत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी भाविकांनी ठेका धरला. महिला भविकानी गरबा खेळून आनंद व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी वामन अवताराची झाकी सादर करण्यात आली. दरम्यान रात्री ८ वा.महामंडलेश्वर सूर्यभान महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.