जळगाव (प्रतिनिधी) सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली असून चांदीचे (Silver) दर पुन्हा एकदा ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. तर (Gold) सोने ५२ हजार रुपये प्रतितोळा झाले आहे.
रशिया व युक्रेन देशांतील युद्धामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून सोने- चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे चांदीला विक्रमी ७३ हजार रुपये प्रति किलोवर भाव झाले होते. तर सोने ५४ हजारांवर पोहोचले होते. मात्र, या युद्धाची व्याप्ती मर्यादित राहिल्याने दरात सरण सुरू झाली व गेल्या आठवड्यापर्यंत सोने ५१ हजार ६०० रूपये व चांदी ६८ हजार ५०० रुपयांपर्यंत आले होते.
आठवड्यात दर तेजीत
अमेरिकन डॉलरचे दर वाढल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढू लागल्याने २६ मार्चला सोने ५२ हजार रुपये प्रतितोळा व चांदी ७० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. डॉलरचे दर सोने- चांदीचे हे भाव कायम होते. एकीकडे डॉलरचे वाढते दर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली मागणीने दर पुन्हा वाढू लागले आहेत.
















