अमळनेर (प्रतिनिधी) धरणगाव येथून जळगाव ते दोंडाईचा बसमधून शिंदखेडा येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभात जात असताना महिलेच्या पर्स मधून दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून सोने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
दि. ०८/०३/२०२७ रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील वय ४८ वर्षे रा. गारखेडे ता. धरणगाव यांच्या तक्रारीवरुन अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी यातील तक्रारदार हे दि. ०६/०३/२०२७ रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास धरणगाव येथुन जळगाव ते दोंडाईचा बस मध्ये वाघोदे ता. शिंदखेडा येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभात जात होत्या. दरम्यान त्यांचा जवळील सोन्याचे दागिने ०२ बांगड्या व मंगलपोत असे त्यांनी पाकीटात ठेवुन पाकीट बैंगमध्ये ठेवले. बसमध्ये त्यांच्या शेजारी दोन महिला बसलेल्या होत्या. त्या महिला अमळनेर येथील चोपडा नाका स्टॉप येथे उतरल्या त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची पर्स चेक केली असता त्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांना मिळुन आले नाही करीता त्यांनी बस मध्ये व आजूबाजुस शोध घेतला परंतु तक्रारदार यांना काही न मिळाल्याने सदर दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे खात्री झाल्यानंतर तक्रार दिली.
वरील तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उप-विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले यांचे आदेशान्वये वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दागिन्यांचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकास आदेश व सुचना देण्यात आल्या. गुन्हा घडल्याचे वृत्त कळताच पोलीस पथक घटनास्थळी जाऊन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर पथकास यातील आरोपी यांचा वास्तव्यास असलेल्या ठिकाणाबाबत गोपनीय माहीती मिळाली, परंतु पोलीस पथक सदर ठिकाणी पोहचण्याच्या आधीच यातील आरोपी हे तेथुन पसार झाले होते. त्यानंतर पोलीसांनी त्यांचे गोपनीय बातमीदार सतर्क करुन व तांत्रीक माहीतीनुसार यातील चोरट्यांचा मुसक्या वरुड ता. वरुड जि. अमरावती येथे आवळल्या आहेत.
सदर कार्यवाही करीत असतांना पोलीस व आरोपी यांच्यात चोर पोलीसांचा खेळ सुमारे ०८ ते ०९ दिवस सुरु होता. दरम्यान यातील आरोपी यांनी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्ये प्रदेश राज्यातील तिगाव, पांडुरणा व इंदौर अश्या ठिकाणी वेळोवेळी बदलविले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी देखील पोहचुन त्यांच्या पुढील वास्तव्याबाबत गोपनीय माहीती काढून शेवटी त्यांना वरुड ता. वरुड जि. अमरावती येथे आठवडे बाजार भागात गाठुन ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महीला आरोर्पीचे नावे गंगा चैना हातगळे वय ४० वर्षे, गंगा सुभाष नाडे वय ४७ वर्षे दोन्ही रा. नेताजी नगर, यवतमाळ ता. जि. यवतमाळ असे आहेत. सदर महिला आरोपींनी वरील गुन्ह्माची कबुली दिली. तसेच ३,६०,०००/-रु. कि. चा ०४ तोळे वजनाचे सोन्याच्या ०२ बांगड्या किंमत बाजार भाव प्रमाणे, ४,२०,०००/- रु. कि. चा ०५ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत किंमत बाजार भाव याप्रमाणे वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल अमळनेर पोलीसांनी हस्तगत करुन वरील महिला आरोपीतांना अटक करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
सदर कार्यवाही अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोथ पथकातील पोलीस उप-निरीक्षक नामदेव बोरकर, पोहेको १९९८ मिलींद सोनार, पोकों २८२६ विनोद संदानशिव, पोकॉ २०२६ प्रशांत पाटील, पोकॉ १३११ निलेश मोरे, पोकॉ १५४१ उज्वलकुमार म्हस्के, पोकों ५३७अमोल पाटील, पोकों १०७७ गणेश पाटील तसेच महिला होमगार्ड ३२४६ निलीमा पाटील, ३२४८ निलीमा पाटील यांनी केली आहे. तसेच नेत्रम कार्यालय जळगाव येथील पोकौं ३३५७पंकज खडसे, पोकों १२९९ कुंदनसिंग बयस तसेच पोकों २३०५ गौरव पाटील, पोकॉ १९७८ मिलींद जाधव यांनी तांत्रिक मदत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकातील पोलीस उप-निरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत.