मुंबई (वृत्तसंस्था) आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,६०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये सोने ४८,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७९,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०३० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७९० रुपये आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने दर 55,558 प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. जे ऑगस्ट 2020 मध्ये नोंदवलेल्या रेकॉर्डपेक्षा कमी आहेत. मंगळवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:23 वाजता सोन्याचा भाव 51,508 रुपयांवर होता.