TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा ; कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2023
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे एकल(Standalone) तसेच एकत्रित (Consolidated) निकाल ९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या कन्सोलिडेटेड महसुलात २५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहित कन्सोलिडेटेड महसूल १,३६१.९ कोटी झाला, तोच गतवर्षी तिमाहीत १,०८२ कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ८.३ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत तोच निव्वळ तोटा १९.५ कोटी रुपयांचा होता.

कंपनीने या सहामाहित कन्सोलिडेटेड महसुलात २२.६ टक्क्यांनी वाढ करून ३,०६३.० कोटी इतकी नोंद केली आहे. या सहामाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ४४.९ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत तोच निव्वळ तोटा ७.७ कोटी रुपयांचा होता. कंपनीच्या हातात चांगल्या ऑर्डर्स आहेत. असे कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

READ ALSO

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धातही सकारात्मक आर्थिक प्रगती कायम राहणार – अनिल जैन
कंपनीच्या ३० सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाही व सहामाहीचे सकारात्मक आर्थिक निकाल आपल्या समोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे. कंपनीने आपली व्यावसायिक रणनिती बदललेली आहे त्याचे सकारात्मक परिणाम गेल्या काही तिमाहिपासून दिसून येत आहेत. प्रोजेक्ट व्यवसायाच्या तुलनेत कंपनीने किरकोळ व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. आयएमडीच्या (INDIA MILLENNIUM DEPOSITS) २०२३ च्या अहवालानुसार मान्सून सरासरीच्या ९४ % झाला. तो संपूर्ण भारतात समाधानकार म्हणता येईल.

आर्थिक वर्षच्या दुसऱ्या तिमाही पावसाळा असल्याने शेतीविषयक कामे कमी असतात आणि त्यामुळे दुसऱ्या तिमाही मध्ये कंपनी इतर तिमाहीपेक्षा कमी महसुलाची नोंद करते. असे असून देखील कंपनीने स्टॅण्डलोन महसुलात गत वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ नोंदविलेली आहे. गत वर्षापेक्षा या वर्षी व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीचा नफा ४५ टक्के झालेला आहे.
प्लास्टिक व्यवसायात जल जीवन मिशन अंतर्गत चांगली मागणी, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पाईप्स, टिश्युकल्चर आणि भारत आणि परदेशातील खाद्य व्यवसायात बाजारपेठेतील वाटा वाढलेला आहे. देशांतर्गत व्यवसायातील भक्कम वाढ आणि उपकंपन्यांमधील चांगली कामगिरी यामुळे कंपनीला (2QFY24) या तिमाही कन्सोलिडेटेड आधारावर महसूलात २५.९ % वाढ आणि व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीच्या कमाई मध्ये ५६% वाढ झाली. कंपनी आपले खेळते भांडवल चक्र (Working Capital Cycle) सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. कंपनी आपल्या उत्पादनातील नावीन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणीय उपाय आणि किरकोळ व्यवसायावर आपले संपूर्ण भारतभर डीलर्स नेटवर्क विस्तारून लक्ष केंद्रित करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात सकारात्मक आर्थिक प्रगती कायम राहण्याची अपेक्षा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केली.

कंपनीच्या पहिल्या सहामाहीचे (Standalone) आर्थिक निकालाचे वैशिष्ट्ये-
एकूण महसुलात ३३.२% ची वाढ.(प्लास्टिक विभागासाठी किरकोळ आणि संस्थात्मक बाजारातील मजबूत मागणी)
हाय-टेक ऍग्री डिव्हिजनला किरकोळ विक्रेत्यांकडील अधिकच्या मागणीमुळे ६.६% ची वाढ.
एकूणच प्लास्टिक विभागात सर्वत्र उल्लेखनीय ८९.३ % ची लक्षणीय वाढ. (उदा. पीई पाईप्स, पीव्हीसी पाईप्स आणि प्लास्टिक शीट). कंपनीकडे एकूण ७९७.५ ₹ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ऍग्रीसाठी – ₹ ३४४.८ कोटी, प्लास्टिक विभाग व इनपुट उत्पादन यांच्यासाठी ₹ ४५२.७ कोटी चा समावेश आहे.

कंपनीच्या पहिल्या सहामाहीचे (Consolidated) आर्थिक निकालाचे वैशिष्ट्ये –
एकूण महसुलात २२.६% ची वाढ.
हाय-टेक ऍग्री विभाग ६.५% ने वाढला.
पीई, पीव्हीसी पाईप प्लास्टिक विभागामध्ये ६२.५% ची लक्षणीय वाढ.
भाजीपाला निर्जलीकरण विभागात वाढ – भारतातील १०.६% तर विदेशातील व्यवसायात ९.६% वाढ.
कंपनीकडे एकूण १,९९०.३ ₹ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ऍग्रीसाठी – ₹ ३४४.८ कोटी, प्लास्टिक विभाग व इनपुट उत्पादन यांच्यासाठी ₹ ४६६.० कोटी आणि कृषी विभाग – ₹ १,१७९.५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
Next Post

भुसावळात गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसासह दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वयाने पाणी पुरवठा योजना यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

May 15, 2023

उत्पादकांना कडक इशारा, कोरोनासंबंधी फसव्या जाहिराती नको

October 22, 2020

शिंदे गटाच्या धरणगाव उपतालुका प्रमुखपदी संजय चौधरी यांची नियुक्ती !

December 31, 2022

जळगावच्या नीरज जोशीची दमदार खेळी — महाराष्ट्राचा विजयश्रीवर शिक्का!

November 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group