मुंबई (वृत्तसंस्था) रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने चांदीच्या भावावर देखील होत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७०० रुपये आहे. चांदी ६८,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही वाढला असून मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,११० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१०० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८० रुपये आहे. मागील काही महिन्यात सोन्याने नऊ महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती. युक्रेन-रशिया तणावाचा प्रभावही जागतिक बाजारावर पडला आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीचे दर वधारले होते. सोने 1 जून नंतरची सर्वोच्च पातळी गाठत प्रति औंस 1,898.63 डॉलरवर पोहोचले होते. जे मंगळवारी 1,913.89 प्रति डॉलर औंसवर आले आहे.
















