मुंबई (वृत्तसंस्था) भारतातील नामंकित आणि मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये लवकरच काही फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत. यासाठीची अधिसूचना TCS कडून जारी करण्यात आली आहे. TCS Smart Hiring Drive या नावानं ही भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी शेवटची तारीख २ नोव्हेंबर आहे.
TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मध्ये BCA, B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे २०२०, २०२१ आणि २०२२ या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात ५ किंवा ५०% पेक्षा जास्त CGPA असणं आवश्यक आहे. २०२२ मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा. उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी.
TCS मधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला परीक्षा घेऊन आणि त्यानंतर मुलखतीद्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेत Verbal Ability वर २४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ३० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. यानंतर Reasoning Ability वर ३० प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ५० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. यानंतर Numerical Ability वर २६ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ४० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण ८० प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी १२० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०२१
परीक्षेची तारीख – १९ नोव्हेंबर २०२१