केंद्र सरकारने देशातील २३ पोस्टल सर्कलमधील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी सरकारी नोकरीची हि सुवर्ण संधी आहे.
इंडिया पोस्टने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, पोस्टमनच्या पदासाठी ५९ हजार ९९, मेल गार्डसाठी ३७ हजार ५३९ आणि मल्टी-टास्किंगच्या पदासाठी ३७ हजार ५३९ जागा आहेत. यासोबतच स्टेनोग्राफर पदांवर सर्कलनिहाय रिक्त जागाही मंजूर करण्यात आल्या आहेत.
नोटीसनुसार, आंध्र प्रदेश सर्कलमध्ये पोस्टमनसाठी २२८९, मेल गार्डसाठी १०८ आणि एमटीएससाठी ११६६ जागा आहेत. तेलंगणा सर्कलमध्ये पोस्टमनसाठी १५५३, मेल गार्डसाठी ८२ आणि एमटीएससाठी ८७८ जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये पोस्टमन पदाच्या ९,८८४ जागा, मेल गार्डच्या १४७ जागा आणि मल्टी टास्किंग पोस्टच्या ५४७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पोस्टल सर्कलमधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी, किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय पोस्टमधील भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३२ वर्षे असावे. उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.