TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागिराच्या कामगिरी पुढे भले भले इंजीनिअर फेल ; मुस्लीम सुताराने बसवले दीड टनाचे शिवलिंग

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिरामध्ये सहस्रेश्वर महादेव शिवलिंग स्थापन करण्यात आले. हे शिवलिंग सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे. ते पाणी वाहून नेणाऱ्या पिंडीवर बसवण्यात आलं. ही पिंड साडेतीन टन असून, त्यात अडीच टन सहस्रेश्वर शिवलिंगाची स्थापना करणे सोपे नव्हते. अतिप्राचीन शिवलिंगाचे नुकसान होण्याचा धोका होता. अशा परिस्थितीत जेव्हा अभियंत्यांनी देखील हार मानली, तेव्हा एका अशिक्षित मुस्लीम सुताराने त्याची सहज स्थापना केली.

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये जगप्रसिद्ध अष्टमुखी भगवान पशुपतीनाथ महादेव मंदिर आहे. या ठिकाणी सहस्त्रेश्वर महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या शिवलिंगाची गोलाई आणि लांबी ६.५० फूट सांगितली जात आहे. शिवाचे हे नवीन रूप जलधारी म्हणजेच जिल्हारीमध्ये क्रेनच्या साहाय्याने बसवलं जाणार होतं. प्रशासनाने पीडब्ल्यूडी, पीएचई, जिल्हा पंचायत यासह सर्व विभागांच्या अभियंत्यांना पाचारण केलं. पण हे शिवलिंग जलधारीवर कसं आणायचं हे कोणीच सांगू शकलं नाही. यानंतर एका मुस्लीम सुताराने मंदिरात शिवलिंग बसवण्याची जबाबदारी घेतली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

जलधारीमध्ये शिवलिंग बसवताना बड्या अनुभवी अभियंत्यांना घाम फुटला तेव्हा तिथे काम करणाऱ्या मकबूल हुसेन अन्सारी या सुताराने या कामात मदत करेल, असं अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर मकबूल यांनी अभियंत्यांना कल्पना दिली की बर्फावर शिवलिंग ठेवल्यास बर्फ वितळण्यासोबतच शिवलिंग हळूहळू जलधारीच्या आत जाईल. मकबूल हुसेन यांची ही कल्पना सर्वांनाच आवडली आणि बर्फाची ऑर्डर देऊन गोलाकार आकारात कापून बर्फाच्या तुकड्यांवर शिवलिंग ठेवलं गेलं. मग बर्फ वितळताच शिवलिंगाने आपली जागा घेतली. आता सगळेच मकबूल हुसैन यांचं कौतुक करत आहेत. गरिबीमुळे मकबूल कधीच शाळेत गेले नाही. त्यांनी सौदी अरेबियात ८ वर्षे मेकॅनिक म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांना अनेक मंदिरे बांधण्याचा अनुभव आहे.

अल्लाह देव एकच – मकबूल

मकबूलने काही मिनिटांतच अभियंत्यांना त्रास देणारी ही समस्या सोडवली. त्यांच्या या कल्पनेमुळे जलधारीत शिव सहस्त्रेश्वर महादेवाची स्थापना झाली. मकबूल म्हणतात, की अल्लाह देव एकच आहे आणि मला खूप आनंद झाला की हे उदात्त कृत्य माझ्याकडून होऊ शकलं. हे शिवलिंग १५०० वर्षांपूर्वी दशपूरच्या होळकर सम्राटाच्या काळात चुना वाळूच्या दगडापासून बनवलं गेलं. हे शिवलिंगही शिवना नदीत सापडलं होतं. शिवना नदीतून अष्टमुखी पशुपतीनाथाची मूर्तीही सापडली. शिवलिंगासाठी जलधारी गुजरातमधून बनवण्यात आली होती. ज्याचं वजन सुमारे साडेतीन टन असून शिवलिंगाचं वजन सुमारे दीड टन आहे.

शिवलिंगाचं वजन दीड आणि जलधारी साडेतीन टन

या कामातील अभियंता दिलीप जोशी सांगतात की, शिवलिंगाचं वजन दीड आणि जलधारी साडेतीन टन आहे. यातील सर्वात मोठी तांत्रिक अडचण म्हणजे चारही बाजूने खांब असल्याने क्रेन आत येऊ शकली नाही. तसंच शिवलिंग दुसऱ्या क्रेनने बसवता येत नव्हतं. जलधारी रोलर पाईपच्या साहाय्याने ठेवण्यात आली होती आणि जेव्हा शिवलिंग ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या दंडगोलाकारामुळे खूप त्रास झाला.

बर्फ वितळण्यासाठी तब्बल १४ तास लागले

यामुळे शिवलिंग खालून पट्टा लावून केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण यातही यश आलं नाही. तेव्हा मकबूल अन्सारी यांनी सांगितलं की, त्यात दीड फूट आत बर्फ ठेवा. मग बेल्टच्या साहाय्याने हे बसवलं, आता ते अगदी योग्य पद्धतीने बसलं असून यात एक मिलिमीटरही फरक नाही. बर्फ वितळण्यासाठी सर्वत्र गरम पाणी ओतलं गेलं. या कामाला तब्बल १४ तास लागले. मकबूल भाईंनी सर्व प्रश्न सोडवले आणि हे ऐतिहासिक कार्य घडले. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, असं दिलीप जोशी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

फडणवीसांच्या घराबाहेरील आंदोलन नाना पटोलेंनी केलं स्थगित ; म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक विभागात ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

July 28, 2021

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

November 10, 2021

अतिदुर्गम आंबापाणीला २० किलोमीटर पायपीट करत पोहचणारे आयुष प्रसाद ठरले पहिले जिल्हाधिकारी !

December 17, 2023

‘हे’ इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही : डब्ल्यूएचओ

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group