नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात आणखी एक सुखद धक्का देऊ शकते. जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार असल्याची माहिती आहे.
नेवारी २०२२ मध्ये महागाई भत्ता किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, ३% DA वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे ती ३४% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ अखेर केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, २०२२ च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर निर्णय येऊ शकतो. असे झाल्यास किमान पगारातही वाढ होईल. पण, सध्या महागाई भत्त्याबाबत AICPI इंडेक्सचा डेटा काय सांगतो, हे पाहुयात
तज्ञांच्या मते, जानेवारी २०२१ मध्येही महागाई भत्ता ३% ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर ३% वाढ झाली तर एकूण DA ३१% वरून ३४% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) ३२.८१ टक्के आहे. जून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२१ च्या महागाई भत्त्यात ३१ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.
जुलै २०२१ पासून DA कॅल्क्युलेटर
महीना गुणांक DA टक्केवारी
जुलै 2021 353 31.81%
ऑगस्ट 2021 354 32.33%
सप्टेंबर 2021 355 32.81%
ऑक्टोबर 2021 – –
नोव्हेंबर 2021 – –
डिसेंबर 2021 – –