मुंबई (वृत्तसंस्था) नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही पदांच्या २१४ हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. अंतर्गत लोकपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२२ असणार आहे.
पद : अंतर्गत लोकपाल – एकूण जागा 214+
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : अंतर्गत लोकपाल या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव घेतला असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सेवानिवृत्त असावेत किंवा सेवारत अधिकारी, डेप्युटी जनरल या पदांवर काम केलेले असावेत. किंवा उमेदवारांनी दुसरी बँक/वित्तीय क्षेत्राचा व्यवस्थापक किंवा समतुल्य नियामक संस्था (सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त) मध्ये काम केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे आवश्यक ते सर्व स्किल्स असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. बँकिंग, नियमन, पर्यवेक्षण, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आणि/किंवा ग्राहक संरक्षण या क्षेत्रात काम करताना किमान सात वर्षे अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अदा करावयाचा मोबदला हा शेवटचं वेतन आणि काढलेल्या भत्त्यापुरता मर्यादित असेल,
वयोमर्यादा : अंतर्गत लोकपाल या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे अधिकतम ७० वर्ष असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रं : बायोडेटा, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक- HRD, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चंदर मुखी, १७ वा मजला, नरिमन पॉइंट मुंबई- ४०० ०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जानेवारी २०२२
लिंक : या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.centralbankofindia.co.in/en या लिंकवर क्लिक करा.
















