जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री मा. श्री. जयकुमार भाऊ रावळ यांनी आज जळगाव येथील बॅरिस्टर निकम चौक परिसरातील महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादितचे उपाध्यक्ष रोहित निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान निकम परिवारातर्फे मंत्री महोदयांचे शाल व श्रीफळ देऊन सस्नेह स्वागत करण्यात आले. सदर भेटीचा उद्देश सौजन्य, स्नेह व सामाजिक संवाद वाढवण्याचा होता.
यावेळी शैलजा दिलीप निकम, रितेश निकम, जितेंद्र लाठी, रमेश पाटील, संजय पाटील, अतुलसिंह हाडा यांसह अनेक सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ही भेट केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक सुसंवाद आणि विकासात्मक दृष्टीकोन यांची प्रचिती देणारी ठरली. मंत्री महोदयांनी रोहित निकम यांच्या कार्याची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली.