जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकार पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणुन केव्हा मान्यता देणार?, महाराष्ट्रातील ८० – ८५ पत्रकार कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. आता तरी शासनाने याची दखल घेऊन पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणुन मान्यता द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा पत्रकार संघ व ज्येष्ठ पत्रकार संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश सरकारने पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणुन मान्यता दिली आहे. बंगालने सुद्धा सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणुन मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात सुद्धा पत्रकारांनी, त्यांच्या संघटनांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. यातच महाराष्ट्रातील ८० – ८५ पत्रकार कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. परंतु शासनाने पाहिजे तशी दखल घेतली नाही. आतातरी दखल घ्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा पत्रकार संघ व ज्येष्ठ पत्रकार संघर्ष समिती करीत आहे.















