मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यपाल यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. मात्र राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे आहे त्यामुळे शिंदे आता नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
















