जळगाव (प्रतिनिधी) जळगाव डेपोचे वाहक मनोज चौधरी यांनी ठाकरे सरकारला व महामंडळातील कार्यपद्धतीस जबाबदार धरत आज (दि.०९) रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, राज्यपालांनी वाहकाच्या आत्महत्येची दखल घ्यावी आणि संबंधितांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे.
आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर आत्महत्या करणाऱ्या वाहकाने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिट्ठी शेअर केली असून त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की ”ह्या आत्महत्येच्या चिठ्ठीची राज्यपाल महोदयांनी SuMoto दखल घेऊन…संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणी सर्वांची रवानगी तळोजा कारागृहात करावी…” असे ट्वीट त्यांनी केले आहे.