पाळधी ता. धरणगाव (प्रातिनिधी) येथील सुप्रसिद्ध जीपीएस मित्र परिवार सध्या परिसरात खूप चर्चेत आलाय. कारण पण तसेच आहे, GPS मित्र परिवार म्हणजे आपुलकी ,स्नेह,सामाजिक एकोपा यासाठी प्रसिद्ध आहे. GPS ग्रुपतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव,त्यात सर्व सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप असो ,नवरात्र उत्सव तर पाळधी परिसरात खूप चर्चिला गेला. कारण तरुणी,महिला वर्ग यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून भव्य असे दांडिया ,गरबाचे आयोजन करण्यात आले, याच गरबा,दांडियाच्या उपक्रमांनी महिला वर्गात GPS ग्रुप विषयी खूप आपुलकी निर्माण झाली आहे.
थंडी वाढल्यापासून गरीब ,निराधार ,अनाथ नागरिकांसाठी GPS ग्रुप धावून गेला व त्यांना थंडीत मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच पार पडलेल्या शिवमहापुराण कथेसाठी GPS ग्रुपतर्फे मोफत भोजनचे वाटप करण्यात आले. त्यात रोज हजार 25 हजार लोकांसाठी स्नेहाची शिदोरीचे वाटप करण्यात आले. अश्या या सामाजिक कार्यासाठी GPS मित्र परिवार अग्रेसर असतो. या ग्रुपसाठी कायम झटणारे माजी जिप सदस्य प्रतापराव पाटील हे कायम नवनवीन संकल्पना मांडत असतात.
परिवारातील प्रत्येक सदस्याची काळजी घेत असतात परिवारमध्ये उद्योगपती ,व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरी ते रोजनदारी काम करणारे सदस्य आहे. पण प्रतापराव यांनी कधीच भेदभाव न मानता, प्रत्येक सदस्य हा माझ्या परिवारातील सदस्य असल्याची भावना कायम ठेवली. इतकेच नाही तर प्रत्येकाच्या सुख दुःख मध्ये पुढे असतात. याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. सदस्यांची काळजी म्हणून प्रत्येक सदस्याचा 10 लाखाचा विमा स्वखर्चाने काढून दिला. तसेच 60 हजाराचा मेडिक्लेम सुद्धा उपलब्ध करून दिला. आपल्या कुटुंबाप्रमाणे मित्रांची काळजी घेणारे युवा नेतृत्व म्हणून प्रतापराव पाटील यांच्याकडे बघितले जातेय.