प्रतिनिधी | जळगाव – आपले यजमान मंत्री, खासदार व आमदार म्हणून काम करीत असताना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे सावलीप्रमाणे उभे राहून मतदारसंघात सर्वच पद्धतीने धुरा सांभाळत काम पुढे नेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींसाठी ‘साक्षलक्ष्मी’ म्हणून आगळावेगळा जागर उपक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामगौरव फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार आहे.*
‘नानात्वेन सुदृढ: समाज!’ म्हणजे विविध उपक्रमांमधून सशक्त समाजाची निर्मिती या उद्देशाने ग्रामगौरव फाउंडेशन राज्यभर काम करीत असताना यंदा नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह राज्यसभेचे खासदार ज्येष्ठ विधिज्ञ अँड.उज्ज्वल निकम, विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह विधानसभेचे सर्व आमदार अशा लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींना तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व खा.स्मिताताई वाघ यांना ‘साक्षलक्ष्मी’ सन्मान देऊन या सर्व महिलांचा आगळा वेगळा जागर करण्यात येणार आहे.
ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे,उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे व सचिव सुभाष मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसात संस्थेच्या कार्याध्यक्षा कु.धनश्री विवेक ठाकरे आपल्या संस्थेच्या महिलांसह प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मानार्थी सौभाग्यवतींना अत्यंत कृतज्ञ भावानेने साक्षलक्ष्मी गौरवचिन्ह देत साडी,खण-नारळाने ओटी भरून सन्मान करणार आहेत.
विकासाच्या शिल्पकाराची साऊली म्हणून उपक्रम :
आपल्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या शिल्पकारांची साऊली बनून साक्षात लक्ष्मीप्रमाणे कार्यरत जिल्ह्यातील सर्वच सौभाग्यवती लोकप्रतिनिधींचा त्यांच्या सामाजिक राजकीय व सर्व क्षेत्रातील योगदानाची दखल म्हणून ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानाने जागर करण्यात येणार आहे.कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने व कौटुंबिक सोपास्कारात हा सन्मान केला जाणार असल्याचे ग्रामगौरव फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या साक्षलक्ष्मींचा होईल जागर :
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई निखिल खडसे,खा.स्मिताताई उदय वाघ,ज्योतीताई उज्ज्वल निकम,मंदाताई एकनाथराव खडसे,मायाबाई गुलाबराव पाटील,साधनाताई गिरीष महाजन,रजनीताई संजय सावकारे, जयश्रीताई अनिल पाटील, सिमाताई सुरेश भोळे,लताबाई चंद्रकांत सोनवणे,प्रतिभाताई मंगेश चव्हाण, मृणालताई अमोल पाटील,सुनीताताई किशोर पाटील,यामिनीताई चंद्रकांत पाटील,जयश्रीताई अमोल जावळे, इत्यादी सौभाग्यवती यांना सन्मानित करण्यात येऊन हा जागर केला जाणार आहे.उपक्रमासाठी ग्रामगौरव फाउंडेशनचे गौरव रणदिवे, योगेश भोई,संजय निकुंभ, रजनी पवार,अरुण इंगळे,दीपा बाणाईत, शीतल वाघ आदी परिश्रम घेत आहेत.
















