धरणगाव (प्रतिनिधी) जल जीवन मिशन अंतर्गत “ हर घर नल से जल ” ही योजना यशस्वी करून लोकांपर्यंत पाणी पोहोचविणे हेच मिशन मानून ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वय ठेवून मुदतीत व दर्जेदार पध्ततीने पा. पु. योजना पूर्ण करण्याचे आवाहन केले. साळवा गावाच्या विकासाठी सर्वानीच एकजुटीने प्रयत्न करा. आपल्या पासून जनहित सध्या व्हावे कोणीही दुखावले जावू नये यासाठी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी झटावे. पक्ष हा कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आम्ही शिवसेना पक्ष सोडला नसून गद्दार कसे म्हणाता ? खरे गद्दार कोण हे जनतेला माहित आहे. ज्वलंत हिंदुत्वासाठी , मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमचा लढा आहे. त्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला. सत्ता हे साध्य नसून जनतेच्या विकासासाठी साधन आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते साळवा येथे विविध विकास कामांच्या उद्घाटना प्रसंगी व पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी पालकमंत्र्यांचे मानले आभार
भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, गावाची कायम स्वरूपी पाणी टंचाई मिटविण्यासाठी साळवा गावाला ४ कोटी ८० लाखाची पाणीपुरवठा योजना, गावाजवळ १ कोटी ६० लाखाचा पूल व नांदेड येथे DPDC प्राथमिक आरोग्य इमारत बांधकाम मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. तसेच भविष्यात एकजुटीने सोबत असल्याचे नमूद केले. महिला आघाडीच्या प्रिया इंगळे यांनी परखडपणे आपले मनोगत व्यक्त करून साळवा गाव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील याची ग्वाही दिली.
या कामांचे झाले उद्घाटन व भूमिपूजन
जलजीवन मिशन अंतर्गत ४ कोटी ८० लाखाच्या गावासाठी वरदान ठरणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच बजेट ( ३०५४) अंतर्गत १ कोटी ४३लाख निधीतून गावाजवळील मोठ्या पुलाचे उद्घाटन विधिवत पूजा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील सर, आभार ग्रा.पं.सदस्य कृणाल इंगळे यांनी मानले. यावेळी नवनिर्वाचित शिवसेनेचे सरपंच आशाबाई कोल्हे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे, सभापती प्रेमराज पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, सरपंच आशाताई कोल्हे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, गटनेता पप्पू भावे, ग्रा.पं. सदस्य इशाताई बोरोले, माधुरीताई नारखेडे, यामिनी नारखेडे, बैमाबी पटेल, कल्पना इंगळे, भूषण बर्हाटे, मोरेश्वर बोरोले, युवसेनेचे दीपक भदाणे, ज्ञानदेव चौधरी,ललित खडसे, भाजपाचे वसंतराव भोलाणे, जिजाबराव पाटील, जिभाऊ अत्तरदे, ललित येवले, मनोज अत्तरदे, तसेच चंद्रशेखर पवार, सतीश पवार, मधुकर नारखेडे, इम्रान पटेल, वाल्मिक पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. परिसरातील सरपंच, शिवसेना – भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.